नमस्कार मंडळी, जागतिक मराठी दिनाचे औचित्य साधून 27 फेब्रुवारी 2020 रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि मराठी असोसिएशन ऑफ मिनिसोटा च्या संयुक्त विद्यमाने आम्ही ग्रंथ तुमच्या दारी योजनेचा शुभारंभ केलेला आहे. या योजने अंतर्गत समस्त मराठी वाचकास दर्जेदार असे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल. हा उपक्रम आपल्यातील काही देणगीदार आणि स्वयंसेवकामुळे शक्य झालेला आहे त्यामुळे सर्व प्रथम त्या सर्वांचे मनपूर्वक आभार.
ह्या योजनेची माहिती खालील प्रमाणे: मिनियापोलिस आणि आजूबाजूच्या प्रत्येक शहरात ह्या मराठी ग्रंथाची पेटी ठेवण्यात आलेली आहे. जवळपासच्या वाचकानी आपापल्या विभागातील खाली दिलेल्या ग्रंथ व्यवस्थापक याच्याशी संपर्क साधावा.
आपण जर यात वाचक म्हणून सहभागी होऊ इच्छुक असाल तर अधिक माहिती साठी mnmarathilib@gmail.com यावर संपर्क करावा. आपण जर देणगीदार किंवा आपल्या शहरात (वरील शहरा व्यतिरिक्त) ग्रंथ व्यवस्थापक म्हणून काम करण्यास उत्सुक असाल तर समन्वयक वैभव साठे यांच्याशी संपर्क करा.
विभाग | व्यवस्थापक |
Brooklyn Park | गौरी लिमकर |
Chanhassen | तुषार बापट |
Eagan | निर्मल चौधरी |
Eden Prairie – I | मुग्धा हळबे |
Eden Prairie – II | अमोल दांडेकर |
Eden Prairie – Kids | कुणाल वझे |
Little Canada | प्रताप भोसले |
Shakopee | शिल्पा साठे |
Maple Grove – I | अभय फडके |
Maple Grove – II | माधवी कामत |
Edina | सायली अमरापूरकर |
Plymouth – I | रसिका राऊत |
Plymouth – II | सीमा गोडबोले |
Plymouth – III | मंजूषा सावंत |
Shoreview – I | रोहिणी माळगी |
St. Paul | मीना मंगळवेढेकर |
Sponsorship / Questions | वैभव साठे |
